Shabana Azmi: शबाना आजमी यांचे हिजाब आणि बुर्क्याबाबत स्पष्ट मत; धर्माच्या नावाखाली महिलांवर बंधने लादणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल!
Shabana Azmi शबाना आजमी यांनी सांगितले की, कुराणमध्ये महिलांनी विशिष्ट प्रकारचा बुर्का परिधान करावा, असे कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही. कुराणमध्ये केवळ नजरेत हया म्हणजेच मर्यादा आणि सभ्यतेची भावना असावी, असे सांगितले आहे. ही गोष्ट केवळ महिलांसाठी नसून पुरुषांनाही लागू होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

Shabana Azmi: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी आपल्या अभिनयासोबतच स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही ओळखल्या जातात. सामाजिक प्रश्न असोत किंवा महिलांच्या हक्कांचा विषय, त्या अनेकदा आपली भूमिका मोकळेपणाने मांडताना दिसतात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी हिजाब आणि बुर्का या विषयावर आपले मत मांडले आहे. विशेष म्हणजे, ‘मी बुर्का घालत नाही, पण कोणी मला बुर्का घालण्यापासून रोखले तर मी तीन बुर्के घालेन,’ असे ठाम विधान त्यांनी केले आहे. (Shabana Azmi)
नुकत्याच उषा काकडे यांच्यासोबत झालेल्या एका संवादादरम्यान शबाना आजमी यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी धार्मिक शिकवण, महिलांचे स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता या विषयांवर आपले विचार मांडले. तसेच धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींचा अर्थ लावणाऱ्या मध्यस्थांवरही त्यांनी टीका केली. (Shabana Azmi)
कुराणमध्ये नेमके काय सांगितले आहे? (Shabana Azmi)
शबाना आजमी यांनी सांगितले की, कुराणमध्ये महिलांनी विशिष्ट प्रकारचा बुर्का परिधान करावा, असे कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही. कुराणमध्ये केवळ नजरेत हया म्हणजेच मर्यादा आणि सभ्यतेची भावना असावी, असे सांगितले आहे. ही गोष्ट केवळ महिलांसाठी नसून पुरुषांनाही लागू होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी त्यांनी धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या मध्यस्थांवरही निशाणा साधला. काही लोक धार्मिक गोष्टींचा अर्थ आपल्या सोयीनुसार बदलून सांगतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. कुराणमध्ये महिलांनी पडदा करावा, असे सांगितले आहे, असा समजही अशाच प्रकारे पसरवला जातो, असे शबाना यांनी म्हटले.
‘कोणी रोखले तर तीन बुर्के घालेन!’ (Shabana Azmi)
या संवादातील शबाना आजमी यांचे एक विधान विशेष चर्चेत आले आहे. त्या म्हणाल्या, ‘मी बुर्का घालत नाही. पण कोणी मला बुर्का घालू नकोस, असे सांगितले तर मी तीन बुर्के घालेन. मला असे सांगणारे तुम्ही कोण?’
पुढे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कट्टर विचारांना प्रोत्साहन देण्यावरही प्रश्न उपस्थित केला. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ एखाद्याच्या वैयक्तिक निवडीवर बंधने घालणे असा होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एखाद्या महिलेने काय परिधान करावे किंवा करू नये, याचा निर्णय घेण्याचा अधिकार तिला असायला हवा, असा संदेश त्यांच्या विधानातून मिळतो.

Shabana Azmi: शबाना आजमी यांचे हिजाब आणि बुर्क्याबाबत स्पष्ट मत; धर्माच्या नावाखाली महिलांवर बंधने लादणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल!
हिजाबच्या मुद्द्यावर यापूर्वीही मांडली होती भूमिका (Shabana Azmi)
शबाना आजमी यांनी पहिल्यांदाच हिजाब किंवा बुर्क्याच्या विषयावर आपले मत मांडलेले नाही. २०२२ मध्ये कर्नाटकातील हिजाब वादाच्या वेळीही त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. उडुपी येथील एका महाविद्यालयात हिजाब परिधान केल्यामुळे सहा विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी हा मुद्दा देशभर चर्चेत आला होता. या प्रकरणावर शबाना यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
राज्यसभेच्या खासदार म्हणूनही बजावली जबाबदारी (Shabana Azmi)
शबाना आजमी केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्ती म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र, १९९७ मध्ये त्यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर मनोनीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. आपल्या अभिनयाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्या संसदेच्या कामकाजात सहभागी होत असत. राज्यसभेतील कार्यकाळात त्यांनी महिला, मुले आणि वंचित घटकांशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले. सामाजिक विषयांवरील त्यांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.
सध्या कोणत्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत?
कामाच्या आघाडीवरही शबाना आजमी सध्या चर्चेत आहेत. त्या अलीकडेच इमरान हाश्मीच्या ‘आवारापन २’ आणि सनी देओलच्या ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटांमध्ये दिसल्या. ‘आवारापन २’मध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली, तर ‘बंटवारा १९४७’मध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अभिनयासोबतच सामाजिक विषयांवरील स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या शबाना आजमी यांचे हे ताजे विधान सध्या चर्चेत आहे.





