अश्‍लील व्हिडिओतून महिलांचा विनयभंग

Updated On:
अश्‍लील व्हिडिओतून महिलांचा विनयभंग

नगर (प्रतिनिधी) –फेसबुक व्हॉट्‌सऍपवर बनावट खाते उघडून महिलांना अश्‍लील व्हिडिओ पाठविणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. प्रमोद किसन कापसे व दीपू लक्ष्मणदास आहुजा ( रा. गांधी रोड, सेक्‍शेन 33,उल्हासनगर ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी फेसबुकवर बनावट खाते उघडले होते.

त्यावरून फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबीयांची अश्‍लील व्हिडिओ व मेसेज पाठवून बदनामी केली. दुसऱ्या घटनेत आरोपीने व्हॉटसऍपवरून अनोळखी नंबरवरून लज्जा उत्पन्न होईल, असे अश्‍लील फोटो व मेसेज पाठवून महिलेला मानसिक त्रास दिल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान अधिनयमाचे कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर क्रॉईमचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक कोळी, योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, अरुण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणखी संबंधित बातम्या

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Newasa News : आत्महत्येच्या सावटातून मुलांना वाचवण्यासाठी सौंदाळा सरसावले; गावात उभारणार मानसिक सुरक्षेचे कवच!

2026-10-03 18:10:21

Newasa News : आत्महत्येच्या सावटातून मुलांना वाचवण्यासाठी सौंदाळा सरसावले; गावात उभारणार मानसिक सुरक्षेचे कवच!

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेला महिला कुस्तीपटूंचे आव्हान

2026-09-25 19:40:31

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेला महिला कुस्तीपटूंचे आव्हान

Newasa News : अतिक्रमण आणि वीज चोरी खपवून घेणार नाही; नेवाशात पोलीस अधीक्षकांचा गणेश मंडळांना सज्जड इशारा!

2026-09-07 18:47:17

Newasa News : अतिक्रमण आणि वीज चोरी खपवून घेणार नाही; नेवाशात पोलीस अधीक्षकांचा गणेश मंडळांना सज्जड इशारा!