दारू पाजून महिलेवर लैंगिक अत्याचार, नंतर अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; तरुणाला अटक

Updated On:
दारू पाजून महिलेवर लैंगिक अत्याचार, नंतर अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; तरुणाला अटक

पिंपरी – दारू पाजून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच यावेळी आरोपीने तिचे अश्‍लील व्हिडिओ काढले. त्याआधारे ब्लॅकमेल करून पैसेही घेतले. ही घटना बालेवाडी आणि चिंचवड येथे घडली. पंकज अनिल खंडागळे (वय 28, रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 5)वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2016 ते 5 मे 2022 या कालावधीमध्ये बालेवाडी आणि चिंचवड येथे घडली. आरोपी खंडागळे यांनी फिर्यादी महिलेशी मैत्री करुन बालेवाडी येथे एका हॉटेलवर नेऊन तिला दारू पाजली. त्यानंतर नशाचे औषध टाकून बेशुद्ध करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेचे व्हिडिओ आरोपीने तयार करून ते व्हायरल करेल अशी धमकी तिला दिली. तसेच फिर्यादी महिलेकडे पैशाची मागणी केली.

त्यानंतर ब्लॅकमेल करून महिलेला चिंचवड येथील लॉजवर सहा ते सात वेळा नेऊन लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिलेकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले. तसेच काही दिवसांपासून आरोपी याचा भाऊ अखिलेश खंडागळे यांच्या मोबाइल नंबर वर गुगल पे पैसे पाठवून देण्यास सांगितले. अशाप्रकारे आरोपी खंडागळे याने फिर्यादी महिलेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला.

आणखी संबंधित बातम्या

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेला महिला कुस्तीपटूंचे आव्हान

2026-09-25 19:40:31

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेला महिला कुस्तीपटूंचे आव्हान

Shooting Coach Sacked : क्रीडा जगतात खळबळ! जंगलात नेऊन महिला खेळाडूंशी अश्लील चाळे करणाऱ्या प्रशिक्षकाची हकालपट्टी

2026-09-05 18:52:03

Shooting Coach Sacked : क्रीडा जगतात खळबळ! जंगलात नेऊन महिला खेळाडूंशी अश्लील चाळे करणाऱ्या प्रशिक्षकाची हकालपट्टी

Pune Crime : पुणे शहर 'विकृती'च्या विळख्यात? ३ महिन्यांत ५० अत्याचार; तुमची मुलं सुरक्षित आहेत का?

2026-05-08 05:45:01

Pune Crime : पुणे शहर 'विकृती'च्या विळख्यात? ३ महिन्यांत ५० अत्याचार; तुमची मुलं सुरक्षित आहेत का?

Liquor Sales Rules : मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी.! आता पेट्रोल पंपांवरही मिळणार दारू; प्रशासनाने स्पष्टच सांगितलं....

2026-03-26 17:08:34

Liquor Sales Rules : मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी.! आता पेट्रोल पंपांवरही मिळणार दारू; प्रशासनाने स्पष्टच सांगितलं....

Pune Crime : चंदननगर हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 'पोक्सो' अंतर्गत २ जणांवर गुन्हा दाखल

2026-03-26 07:00:56

Pune Crime : चंदननगर हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 'पोक्सो' अंतर्गत २ जणांवर गुन्हा दाखल