वाशिम : सध्या देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकाता आणि बदलापूर या प्रकरणांनी संपूर्ण देश हादरला आहे. यादरम्यान आता वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर अपहरण करून तीन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर अपहरण करून तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 21 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास घडली. पिडीत बालिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीच्या जबानीवरून पोलिसांनी तीन नराधम आरोपीना अटक केली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता पिडीत बालिकेचे या पैकी एका आरोपीशी मैत्रीचे संबध होते असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता 395, 224 कलम 137(2)3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वेय गुन्हा दाखल केलाय. तर गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्ह्यात कलम 64(2)(आय)65 (1) भारतीय न्याय संहिता कलम 45 (एन) 6,8,12 2023 अन्वेय गुन्हा दाखल करून पास्को अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.