पाकिस्तानात गव्हाच्या पीठाची तीव्र टंचाई
Updated On:

लाहोर : जगात गव्हाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर असलेल्या पाकिस्तानात गव्हाच्या पीठाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना पोळ्या आणि नान खाणे अवघड बनले आहे. बाजारातून गव्हाचे पीठ गायब झाल्याने पाकिस्तानी जनतेच्या रोटी, नान मिळणेही अवघड बनले आहे. बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुन्वा या सर्व चार प्रांतांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे.
पाकिस्तानातील लोक पोळी आणि नान मिळत नाही. या आपत्तीच्या निवारणासाठी सर्व प्रांतांमधील सरकारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. या स्थानिक सरकारांकडून जनतेला दररोजच्या जेवणात मुख्यत्वे तांदळाचा वापर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. प्रसिद्धी माध्यमांनुसार, पाकिस्तानत गेल्या अनेक महिन्यांपासून गव्हाच्या पीठाचा तुटवडा निर्माण झाला आहे.





