वारजे –शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. 2022-23च्या पालिकेच्या अर्थसंकल्पात जिवन प्राधिकरण योजना हस्तांतरित करण्यासाठी आयुक्त विक्रमकुमार व पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी यांनी प्रयत्न करणे गरजेचे होते.
परंतु, मनपा मुख्यसभेने मंजुरी व स्थायी समितीच्या मान्यतेनंतरही पुणे महानगरपालिकेने या योजनेसाठीच 14 कोटी रुपयांची तरतूद केली नाही. आयुक्तांनी मुख्य खात्याच्या बजेटमध्ये ही तरतूद करावी व शिंदे पूल येथील प्राधिकरणच्या पाणीलाइनला त्वरित जोडण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच सुभाष नाणेकर, भगवानराव गायकवाड, सुभाष शिंदे यांनी दिला आहे.