Lok Sabha Election 2024| मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज १ जून रोजी (शनिवार) मतदान होत आहे. देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोरी जात आहेअखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. सकाळी सात वाजल्यापासून सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.
यात पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व ४ जागांसाठी अखेरच्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तरप्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ३ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, चंदिगढमधील एकमेव जागेसाठीही मतदान पार पडले जात आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. Lok Sabha Election 2024|
#WATCH | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath casts his vote at a polling booth in Gorakhnath, Gorakhpur.
The Gorakhpur seat sees a contest amid BJP’s Ravi Kishan, SP’s Kajal Nishad and BSP’s Javed Ashraf. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/2Ao7uC7slU
— ANI (@ANI) June 1, 2024
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या गोरखनाथ येथील मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. या जागेवर भाजपचे रवी किशन आणि समाजवादी पक्षाच्या काजल निषाद यांच्यात लढत आहे. तर बसपाने येथून जावेद अश्रफ यांना तिकीट दिले आहे. Lok Sabha Election 2024|
दरम्यान, लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ७ टप्प्यांचे नियोजन करण्यात आले. त्या मॅरेथॉन प्रक्रियेचा प्रारंभ १९ एप्रिलला झाला. तर १ जूनला मतदानाचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर आता याचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ४ जूनला जाहीर होणार आहे.
हेही वाचा :
पंतप्रधानांचे शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी ८ राज्यांमधल्या मतदारांना आवाहन ; म्हणाले…





