पुणेः शहरातील स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागातून अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी महिलेला आणि एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. यानंतर पुणे पोलिसाांनी बनवाट पद्धतीने नागरिकत्व मिळून घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीं विरोधात कारवाईचा बडगा उगारलेला आहे. अशातच अभिनेता सैफ अल्ली खानवर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशी होती अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. यानंतर राज्यात अवैध पद्धतीने घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीं विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्यात अवैध पद्धतीने आणि बनावट नागरिकत्व मिळवून घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सोमय्या यांनी नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. तसेच अकोला आणि अमरावती जिल्ह्यात बांगलादेशींनी बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यात १५ हजार ८४५ बांग्लादेशींनी बनावट नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचे देखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत. महाविकास आघाडीने विधानसभेत व्होट जिहादसाठी हे घडवून आणल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी अमरावती, भिवंडी आणि मालेगावात बांगालादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे म्हटले आहे. त्या लोकांची चौकशी केली जाणार नोव्हेंबर महिन्यात ज्यावेळी मालेगाव मध्ये गेलो होतो. त्यावेळी ही धक्कादायक बाब पुढे आली. दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचे कारस्थान झाले आहे, असा खुलासा देखील सोमय्या यांनी केला. यामुळे मालेगावचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. जे 1 लाख 7 हजार लोकांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे देखील सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या यांनी सांगितलेली बांगलादेशी घुसखोरांची आकडेवारी अकोला – 4849 अकोट – 1899 बाळापूर – 1468 मुर्तिजापूर – 1070 तेल्हारा – 1262 पातूर – 3978 बार्शिटाकळी – 1319 एकूण 15,845