तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यासह 7 जणांवर गुन्हा नोंद

जमावबंदीचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये जमावबंदीच्या आदेशचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणी तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्दी जमवून मास्क न घालता वाढदिवस साजरा केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यासह 7 जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महंत तुकोजी बुवा यांचा वाढदिवस साजरा करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यामुळे हे प्रकरण महंत तुकोजी बुवा यांना चांगलेच भोवले आहे.

महंत तुकोजी बुवा यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला. यावेळी महंत वाकोजीबुवा, ऍड. संजय पवार, विशाल रोचकरी आणि इतर 3 जणांनी तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वापरले नाही. शिवाय सोशल डिस्टन्सच्या नियमांचेही पालन न करता बेकायदेशीरपणे जमाव जमवला. त्यांनी आपल्या वाढदिवसाचा 11 सेकंदचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावरही पोस्ट केला. सुरज जगताप या नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. पोलिसांनी या व्हिडीओच्या आधारे या सर्व व्यक्तींविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.