शिरूर -शिरूर शहरातील मारुती आळी, गुजर मळा, पवार मळा, मुंबई बाजार याठिकाणी करोना बाधित सात रुग्ण आढळले आहेत. तर डंबेनाला येथील फटाकडे व्यवसायिक 65 वर्षे पुरुषाचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
शहरात आज पर्यंत करोनामुळे चौथा मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाची साखळी रोजच वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात बाधित संख्या वाढत आहे.
शहरात आज मारुती आळी येथील 65 वर्षीय महिला, गुजर मळा येथील 36 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, पवार मळा येथे 42 वर्षे पुरुष, मुंबई बाजार येथे 75 वर्षीय वृद्ध, तर आणखी एक ठिकाणी 61 वर्षीय पुरुष, यशवंत कॉलनी येथे 23 वर्षीय 1 असे एकूण शिरूर शहरात 7 बाधित रुग्ण आढळले.