भवानीनगर -श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल वणवे व उपाध्यक्षपदी विजया देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इंदापूर येथील सहायक निबंधक सहकारी संस्था इंदापूर येथील कार्यालयामध्ये अध्यासी अधिकारी जिजाबा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्याने अध्यक्षपदासाठी वणवे व उपाध्यक्षपदासाठी देवकाते यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जिजाबा गावडे यांनी वणवे व देवकाते यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली.
यावेळी नंदकुमार निंबाळकर, बाळासाहेब पाटील, राजेंद्र भोसले, दत्तात्रय गावडे, बाळासाहेब जामदार, राहुल साबळे, बाळासाहेब गोवेकर, सुधीर घुले, शिवाजी तांबे, राजेंद्र आटोळे, भालेराव झारगड, दादासाहेब साळुंखे उपस्थित होते.