चाकूने 43 वार करत नोकराने केला मालकीणीचा खून; 3 वर्षानंतर आरोपीला जन्मठेप

जालना – मालकासोबत झालेल्या वादातून राग अनावर झाल्याने नोकराने किचन रूममधील चाकूने ४३ वार करून मालकीण संगीता लाहोटी (पोस्ट ऑफिस रोड, जालना) यांचा खून केल्याची घटना १४ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी असलेली लीलाबाई साबळे ही महिला, पोलिसांच्या चार्जशिट अहवाल हे पुरावे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा लागण्यास महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
भीमराव निवृत्ती धांडे (६४, नूतन वसाहत, अंबड रोड, जालना) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी धांडे हा लाहोटी यांच्याकडे ४० वर्षांपासून घरकाम करत होता. मृत संगीता लाहोटी यांचे पतीअालोक लाहोटी यांनी धांडे यास जितेन नाथानी याचामोबाइल नंबर का घेतो? असे विचारले म्हणून आरोपीने आलोक लाहोटी यांना दगड फेकून मारला व नंतर कॉलर पकडून भांडण केले.
नंतर पोलिस स्टेशन येथे आलोक लाहोटी हे आरोपीविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले होते. या वेळी आरोपीने माफी मागून त्याच्या विरुद्धतक्रार देऊ नका, अशी विनंती केली. त्यानंतर सदरील घटनेचा राग मनात धरून धांडे हा घरी आला. नंतर चाकूने संगीता लाहोटी यांचा खून केला होता.





