Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात घडत आहे. यातच आता रविवारी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाशिममधील वनोजाजवळ महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला जोरदार धडक बसल्यामुळे खासगी बस उलटली. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना रुग्ण वाहिकेतून जखमी प्रवास्यांना कारंजा आणि अकोला इथे उपचारासाठी पाठवण्यात आले. या खासगी बसमध्ये 30 ते 35 जण प्रवास करत होते. Samruddhi Mahamarg Accident | आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राजलक्ष्मी कंपनीची साईरथ नावाची खासगी बस पुण्यावरून नागपूरकडे निघाली होती. मात्र वाशिममध्ये बस आल्यानंतर चालकाला झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याचा माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. Samruddhi Mahamarg Accident | हेही वाचा: … अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल, फास्टॅगसंदर्भातील नियमात झाला मोठा बदल