अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी: सेंसेक्‍स 1200 अंकांनी वधारला

गोवा : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर कपातीची घोषणा केल्यानंतर 1200 अंकांनी शेअर बाजार वधारला आहे. आर्थिक मंदीवर टीकेला तोंड देत केंद्र सरकारने कंपन्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केली. यावेळी त्यांनी आज आम्ही देशी कंपन्या आणि नवीन देशांतर्गत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर दर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवतो. या नव्या घोषणेनुसार कंपन्यांसाठी नवीन कॉर्पोरेट कर दर 25.17 टक्के निश्‍चित करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांना यापुढे आणखी कर भरावा लागणार नाही. दरम्यान, अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर उद्योग जगताला मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.