Stock Market : शेअर बाजाराला पुन्हा धक्का! सेन्सेक्स 330 अंकांनी घसरला, निफ्टी 23,329 वर बंद
Stock Market : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली. सेन्सेक्स 330 अंकांनी घसरून 74,529 वर, तर निफ्टी 85 अंकांनी घसरून 23,329 वर बंद झाला.

Stock Market : जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या दरात घसरण असूनही भारतीय शेअर बाजार मंगळवारी घसरणीसह बंद झाला. आयटी, वित्तीय आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव राहिल्याने बाजार निर्देशांक खाली आले.
सेन्सेक्स 329.91 अंकांनी घसरून 74,529.08 अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो 435 अंकांपर्यंत घसरला होता. निफ्टी 85.30 अंकांनी घसरून 23,329 अंकांवर स्थिरावला.
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, सन फार्मा, टीसीएस आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागांत घसरण झाली. तर एटरनल, इंडिगो, टायटन आणि टाटा स्टीलमध्ये वाढ झाली.
ब्रेंट कच्च्या तेलाचा दर 1.67 टक्क्यांनी घसरून 98.66 डॉलर प्रति बॅरल झाला. सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 576.20 कोटी रुपयांची गुंतवणूक काढली.
गुंतवणूकदारांचे ₹2.37 लाख कोटी पाण्यात!
एक व्यावसायिक दिवस आधी म्हणजेच 21 सप्टेंबर 2026 रोजी बीएसईवर (BSE) सूचीबद्ध असलेल्या सर्व समभागांचे (shares) एकूण मार्केट कॅप ₹4,82,68,385.61 कोटी होते. आज म्हणजेच 22 सप्टेंबर 2026 रोजी ते घसरून ₹4,80,30,572.59 कोटी राहिले आहे.
म्हणजेच, आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹2,37,813.02 कोटी (अंदाजे ₹2.37 लाख कोटी) घट झाली आहे.






