Sensex Closing Bell : भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम

– सेन्सेक्सने घेतली 205 अंकांची उसळी
– निफ्टी 19750 च्या जवळ
नवी दिल्ली :- भारतीय शेअर बाजार मंगळवारी विक्रमी पातळीवर बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात विक्रमी वाढ झाल्यानंतर नफावसुली दिसली परंतु असे असतानाही सेन्सेक्स 205 अंकांच्या वाढीसह बंद झाला.
मंगळवारी सेन्सेक्स 205.21 (0.31%) अंकांच्या वाढीसह 66,795.14 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 37.80 (0.19%) अंकांच्या वाढीसह 19,749.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
दोन्ही निर्देशांक प्रथमच या पातळीवर बंद झाले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात आयटी क्षेत्रातील समभागांनी बाजारात मजबूती दाखवली. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रात भरघोस खरेदी दिसून आली, ज्यामुळे निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला, परंतु त्यानंतर बाजारात नफावसूली दिसून आली.
दुसऱ्या सहामाहीत बँकिंग विशेषतः PSU बँकांच्या समभागांमध्ये मोठी घसरण आणि जागतिक बाजारातील कमजोरीमुळे बाजारावर दबाव आला.




