Crime News : खळबळजनक ! ‘या’ भाजप नेत्याचा पत्नीसह तीन मुलांवर गोळीबार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये एका भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे तर भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
योगेश रोहिल्ला असं या भाजप नेत्याचं नाव आहे. तो भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक दृष्ट्या आजारी होता असे समोर आले आहे. मात्र त्याने आपल्या कुटुंबावर का गोळीबार केला हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे, मात्र त्याने हत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेत तीनही मुलांचा मृत्यू झाला आहे, तर पत्नीची प्रकृती देखील गंभीर आहे. या घटनेबाबत अधित तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





