Mumbai News : खळबळजनक ! मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ पाकिस्तानी नंबरवरून मुंबई पोलिसांना आला मेसेज

मुंबई : मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वरळी वाहतुक शाखेला आला.पाकिस्तानी नंबरवरुन हा व्हाट्सअँप मॅसेज पोलिसांना बुधवारी आला होता. वरळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव शहाबाज हुमायून राजा देव असल्याचे सांगितले आहे. मेसेज करणारी व्यक्ती ही भारतातील की बाहेरील याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जात आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज केल्याची माहिती आहे.
गेली काही दिवस धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीने मित्राचा बदला घेण्यासाठी अशाप्रकारे धमकी पाठवल्याचे स्पष्ट झाले होते. तर भाजप आमदार श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.





