Crime News : शिरुरमध्ये खळबळ…! डॉक्टरकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
Crime News : शिरूर पोलीस स्टेशन येथे डॉक्टर श्रीकांत बबन वेताळ यांसह बबन वेताळ व नंदा बबन वेताळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर : शिरूर शहरातील एका डॉक्टर कडून डॉक्टर पत्नीचा हॉस्पिटलसाठी माहेरहून पंचवीस लाख रुपये आणण्यासाठी छळ करत डॉक्टर पत्नीला मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची तसेच तक्रार केल्यास माझी अजित पवार, सुनिता पवार दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत ओळख असल्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे डॉक्टर श्रीकांत बबन वेताळ यांसह बबन वेताळ व नंदा बबन वेताळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर शहरातील डॉ. श्रीकांत वेताळ यांचा विवाह डॉ. समीक्षा बनसोडे यांच्यासोबत झालेला असताना डॉ. श्रीकांत यांनी पत्नी डॉ. समीक्षा यांच्यावर हॉस्पिटल साठी माहेरहून पंचवीस लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकला. डॉ. समीक्षा यांनी नकार दिला असता श्रीकांत यांनी तू पैसे आणले नाही तर मी तुला सोडून देईल नाहीतर माझे आई वडील तुला घरात राहू देणार नाही असे म्हणत दमदाटी केली. त्यानंतर मारहाण करून डॉक्टर समीक्षा यांना भर पावसात फरपटत घरातून बाहेर काढले.
दरम्यान, समीक्षा यांना तू कुठे तक्रार केली तर बघ, माझी अजित पवार, सुनेत्रा पवार यांसह दत्तामामा भरणे यांच्यापर्यंत ओळख आहे. माझे कोणीही काही करू शकत नाही असे धमकावून वारंवार डॉ. समीक्षा यांना दमदाटी करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकाराबाबत डॉ. समीक्षा गणेश बनसोडे ( समीक्षा श्रीकांत वेताळ ) वय ३३ वर्षे रा. बागवान नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी डॉ. श्रीकांत बबन वेताळ, नंदा बबन वेताळ व बबन वेताळ सर्व रा. बागवान नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल गवळी हे करत आहे.





