पुणे : ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ पत्रकार असीम मोहम्मद शेख (वय ५५) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांचा दफनविधी लष्कर भागातील तांडेल मशीद परिसरातील साचापीर मुस्लिम कब्रस्तान येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. गुन्हे-कायदा-सुव्यवस्था, न्यायव्यवस्था, पुणे छावणीशी संबंधित बातमीदारीत असीम शेख यांचा हातखंडा होता. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी बातमीदार म्हणून पत्रकारितेत कारकिर्दीस सुरुवात केली. मुंबई मिड डे, द महाराष्ट्र हेरल्ड आदी वृत्तपत्रात काम केल्यानंतर मागील अठरा वर्षांपासून ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.