BJP Leader Raj Purohit Passed Away | मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचं निधन झालं आहे. ७० वर्षीय पुरोहित यांनी आज पहाटे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १५ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते, मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित हे त्यांचे पुत्र आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. एकीकडे मुलाच्या विजयाचा आनंद असतानाच राज पुरोहित यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. BJP Leader Raj Purohit Passed Away | राज पुरोहित यांचा राजकीय प्रवास राज पुरोहित यांनी २५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात भाजपचा विस्तार करण्यास मोलाची भूमिका पार पडली. ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते. युती सरकारमध्ये (१९९५-१९९९) त्यांच्यावर कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसंच नंतर गृहनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी मुंबईतील भाडेकरूंसाठी महत्त्वपूर्ण काम केले होते. मुंबईतील अमराठी मतदारांना भाजपसोबत जोडण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. BJP Leader Raj Purohit Passed Away | पुरोहित यांचे पार्थिव बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार असून सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि सोनापूर लेन स्मशानभूमीमध्ये पुरोहित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. BJP Leader Raj Purohit Passed Away | हेही वाचा: पुणे शहरातील उद्या प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी