नवी दिल्ली – आता सोन्याच्या दागिन्यांवर ‘हॉलमार्क’ (Hallmark) असणे अनिवार्य केले आहे. बुधवारी (दि. १५) ग्राहक मंत्रलयाकडून याबद्दलचा आदेश जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता १५ जानेवारी २०२१ पासून फक्त हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विकता येणार आहे. जर हॉलमार्क शिवाय सोन्याचे दागिने विकले तर सराफाला एक वर्ष्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी (दि. १४) दिली. तसेच, जुने दागिने विकण्यासाठी सोने व्यापाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी सुद्धा देण्यात आला आहे.