वंजारी सेवा संघाच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांची निवड
Updated On:

पुणे – वंजारी सेवा संघाच्या पुणे शहर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर व पुणे जिल्हा अध्यक्ष किसनराव नांगरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. पुणे शहर अध्यक्ष म्हणून बंडू जायभाये तर पुणे शहर कार्याध्यक्षपदी विक्रम फुंदे यांची राज्य कार्यकारणीच्या सहमतीने निवड करण्यात आली.
यावेळी वंजारी सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष किसनराव नांगरे, लातूर जिल्हा अध्यक्ष वैजनाथ लहाने, प्रा. ईश्वर लहाने, शिवहार लहाने, राजेंद्र आठळे, पंकज नांगरे, अशोक तिडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

