निवड समितीकडून खेळाडूंचे खच्चीकरण

नवी दिल्ली – भारतीय संघाची निवड समिती सध्या खेळाडूंचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे. यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा व ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करताना त्यांनी अनेकदा या दोघांचे संघातील स्थान सातत्याने डळमळीत ठेवले आहे, अशा शब्दांत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने टोला लगावला आहे.
पहिल्या कसोटीतील सुमार कामगिरी नंतर भारतीय संघात चार बदल झाले. त्यातच साहा याच्याजागी पंतला दुसऱ्या कसोटीत संधी दिली गेली. मात्र, जर पंत या सामन्यात किंवा त्यापुढील सामन्यांत अपयशी ठरला तर निवड समिती कोणाला खेळवणार. खरेतर समितीने खेळाडूला जास्तीत जास्त संधी दिली व तरीही कामगिरीत सुधारणा झाली नाही तर बदल करा, पण सध्या निवड समिती एकाच सामन्याचा निकष लावून प्रत्येक सामन्यात संघात बदल करत आहे. खेळाडूंसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. अशा गोष्टींमुळे खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होते, असेही गंभीरने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासाठी चार मोठे बदल केले आहेत. वृद्धिमान साहा आणि पृथ्वी शॉ यांना खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले आहे. साहाच्या जागी ऋषभ पंतला संघात घेतले आहे. भारतीय संघातील या बदलावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या मनात असुरक्षा निर्माण केली आहे. पहिल्या कसोटीतील सुमार कामगिरीनंतर साहाला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. जर ऋषभ पंत पुढील दोन सामन्यात अपयशी ठरला तर तुम्ही त्याला अशाच पद्धतीची वागणूक दिली जाणार का. ही गोष्टी खूप वाईट आहे की साहाला फक्त एका कसोटीनंतर संघाबाहेर करण्यात आले.
पंत दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात चांगला खेळला नाही तर तुम्ही परत साहाला संघात घेणार का? असा सवाल त्याने विचारला. यामुळे खेळाडूंच्या असुरक्षिततेचे वातावरण तयार होते. यामुळेच भारतीय संघ अस्थिर वाटत आहे, असे मतही गंभीरने व्यक्त केले.





