Sehar Shaikh Case : ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या माजी नगरसेविका सहर शेख (Sehar Shaikh Case) यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहर शेख यांचे वडील युनूस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी (Sehar Shaikh Case) सर्व आरोप फेटाळून लावत, आगामी दोन दिवसात आमची भूमिका स्पष्ट करू, करारा जवाब मिलेगा, असा इशारा दिला आहे. सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनूस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांनी महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर ‘नमुना १०’ ऐवजी ‘नमुना ८’ चा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केली. Sehar Shaikh Case या कागदपत्रांच्या आधारे सहर शेख (Sehar Shaikh Case) यांनी मुंबईतून जात प्रमाणपत्र मिळवले आणि निवडणूक जिंकली, असा आरोप आहे. सहर शेख पोलीस तपासासाठी नॉट रिचेबल असताना, १६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना पाहण्यासाठी त्या वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होत्या. त्यांनी स्वतः याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्याने टीकेची झोड उठली आहे. यावर युनूस शेख यांनी, तिने सामना पाहायला जाण्यात चुकीचे काय?” असा सवाल करत आपल्या मुलीची पाठराखण केली. “मुलगी मोठी होत असल्याने अनेकांना जळफळाट होत असून हा केवळ राजकीय स्टंट आहे,” असेही ते म्हणाले. आता दोन दिवसांत शेख कुटुंबीय काय पुरावे सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.