नवी दिल्ली : गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये सत्तेत येण्यासाठी आपने प्रचारात जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडीत आता गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाला आपल्याला मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका केजरीवाल यांनी यावेळी केली आहे.
रविवारी गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथील आपच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. याबाबत आपचे नेते इसुदान गढवी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “अरविंद केजरीवाल यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी आपच्या कार्यालयावर छापा टाकत दोन तास झाडाझडती केली. तसेच, आम्ही पुन्हा येऊ,” असेही पोलिसांनी म्हटल्याचे गढवी यांनी सांगितले.
केजरीवाल जी के अहमदाबाद पहुँचते ही आम आदमी पार्टी के अहमदाबाद ऑफ़िस पर गुजरात पुलिस की रेड। दो घंटे तलाशी लेकर चले गए। कुछ नहीं मिला। बोले फिर आयेंगे।
— Isudan Gadhvi (@isudan_gadhvi) September 11, 2022
यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “गुजरातमध्ये आपला नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. हे पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिल्लीनंतर गुजरातमध्येही छापेमारी सुरू झाली आहे. दिल्लीत काही सापडलं नाही, गुजरातमध्येही काही मिळालं नाही. आम्ही प्रामाणिक देशभक्त लोक आहोत.”
गुजरात की जनता से मिल रहे अपार समर्थन से भाजपा बुरी तरह बौखला गयी है। “आप” के पक्ष में गुजरात में आँधी चल रही है
दिल्ली के बाद अब गुजरात में भी रेड करनी शुरू कर दी। दिल्ली में कुछ नहीं मिला, गुजरात में भी कुछ नहीं मिला
हम कट्टर ईमानदार और देशभक्त लोग हैं https://t.co/GBu1ddoSIY
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 11, 2022
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरामधील नागरिकांसाठी काही घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये वीज मोफत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. “आम्ही सर्व घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. आम्ही सर्व शहरे आणि गावांमध्ये 24X7 वीज पुरवठा सुनिश्चित करू. जर त्यांच्या पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळाली तर 31 डिसेंबर 2021 पर्यंतची सर्व जुनी वीज बिले माफ केली जातील. गुजरातमध्ये दोन महिन्यांचे वीज बिल येते. दरमहा 300 युनिटनुसार, 600 युनिट दोन महिन्यांच्या बिलात मोफत उपलब्ध होईल,” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.