अपघात झालेला पाहून अभिनेता सोहेल खान धावला.. महिलेला रस्त्यावरच मदत करत दाखवली माणुसकी

मुंबई – सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. एका अपघातग्रस्त महिलेला मदत केल्यामुळे सोहेल चर्चेत आला आहे. एक स्टार असूनही सोहेलने दाखवलेल्या या माणुसकीमुळे सोशल मीडियावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
अभिनेता सोहेल खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये जमिनीवर पडलेल्या महिलेला पाहून सोहेल खूपच अस्वस्थ झालेला दिसत आहे. तो त्या महिलेला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अगदी काही सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये सोहेलसोबत इतर काहीजण देखील महिलेची मदत करताना दिसत आहेत. महिलेचा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
View this post on Instagram
सोहेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर कमेंट करताना चाहते सोहेलचे मनापासून कौतुक करताना दिसत आहेत.अभिनेता सोहेल मोठ्या पडद्यापासून लांब असला तरी तो चर्चेत असतो. सोहेल सध्या निर्माता बनून भाऊ सलमानसोबत चित्रपटांची निर्मिती देखील करतो. त्यासोबतच अनेकदा तो काही रिऍलिटी शोजमध्ये जज म्हणून देखील दिसून येतो.

