मुंबई – एमटीव्हीचा प्रसिद्ध “सुपर मॉडेल ऑफ द इयर’ हा रिअॅलिटीशो नेहमीच चर्चेत असतो. प्रत्येक आठवड्यात या शो मध्ये काहीतरी खास पाहायला मिळते. प्रत्येकवेळी या शो मध्ये मलायका अरोरा आणि मिलिंद सोमण नवीन लूकमध्ये दिसतात. सुपर मॉडेल ऑफ द इयर मध्ये मलायका आणि मिलिंद परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहेत.
हे दोघेही रॅम्पवॉक करुन अनेकांना भुरळ पाडताना दिसतात. नुकतंच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मिलिंद एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. या अवतारात त्याला पाहताना अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
देशातील पहिला पुरुष सुपर मॉडेल म्हणून अभिनेता मिलिंद सोमनने ओळख बनवली आहे. रॅम्पवॉक वर मिलिंद शर्टलेस व फक्त पांढऱ्या रंगाचे धोतर नेसून रॅम्पवॉक करत आहे. मिलिंद या लूकमध्ये एवढा हॉट दिसतोय की कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा मिलिंदवरून हटत नाहीयत. विशेष म्हणजे मिलिंदला पाहून मलायका अक्षरशः जोरजोरात ओरडत असल्याचे दिसून येत आहे.
मालयकाच्या अश्या ओरडण्याने अनेकांनी तिला ट्रॉल देखील केले आहे. “ती त्या क्षणी मिलिंदला पाहून अर्जुन कपूरला देखील विसरली असल्याचे’ अनेकजण सोशल मीडियावर कमेंट्स करत आहेत. मिलिंदला शर्टलेस पाहून मलायका खूपच आनंदी झाली आहे. तिचा हा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत आहे.