कर्जत – कोंभळीतील भैरवनाथ शेतकरी गटाने करोनाच्या परिस्थितीत बियाणे खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कर्जतच्या अमरसिंह ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विठ्ठल पिसाळ यांच्याशी संपर्क करून बीडीएन 711 जातीचे 100 किलो तुरीचे बियाणे मागवून घेतले. कंपनीने त्यांना बांधावर बियाणे उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय झाली. गटाने एकत्र मागणी दिल्यामुळे त्यांना कमी किंमतीमध्ये बियाणे उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी विविध गट तयार करून लागणारे बियाणे, खते ही गटाच्या माध्यमातून एकत्र खरेदी करावीत, असे आवाहन सरपंच कुंडलिक गांगर्डे यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अक्षय गांगर्डे, भगीरथ गांगर्डे, रामचंद्र गांगर्डे, जयसिंग गांगर्डे, विकास गांगर्डे, अमोल गांगर्डे, सचिन जगदाळे, तुषार गांगर्डे, गणेश खंडागळे आदी उपस्थित होते.