पहलगाम हल्ल्यावरील पोस्ट अन् लोकप्रिय गायिकेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

Neha Singh Rathore | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका प्रसिद्ध गायिकेने आक्षेपार्ह पोस्ट केली. ज्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. नेहा सिंग राठोड असे भोजपुरी गायिका आणि युट्यूबरचे नाव आहे.
या पोस्टनंतर नेहा सिंगविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा सिंह राठोडवर देशविरोधी विधाने केल्याचा आणि जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लखनऊमधील गुडांबा येथील रहिवासी कवी अभय प्रताप सिंह यांनी नेहा सिंग राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलं आहे. नेहा सिंग राठोडवर लावलेले मुख्य आरोप म्हणजे देशविरोधी विधाने करणे आणि जातीय तणाव वाढवणे हा आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील नेहा सिंहची पोस्ट
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी नेहा सिंहने केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर जाती आणि धर्मावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. तिने म्हटले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला, हा हल्ला गुप्तचर आणि सुरक्षेचे अपयश होता. मी या सरकारला काय प्रश्न विचारू? शिक्षण आणि आरोग्याचे मुद्दे आता संबंधित नाहीत. लोक मारले जात आहेत आणि हिंदू-मुस्लीम तणाव शिगेला पोहोचला आहे.”
”मी माझ्या धर्मासोबत आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मला विरोध करणे म्हणजे याला राजकारण म्हणतात का? जर हे राजकारण असेल तर मग हुकूमशाही म्हणजे काय? भाजप हा देश नाही आणि पंतप्रधान हा देव नाही. लोकशाहीमध्ये टीका होईल आणि प्रश्नही विचारले जातील,” असं म्हणत तिने भाजप आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तिने भाजपावर पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली मते गोळा केल्याचा आरोप केला. तिने आगामी बिहार निवडणुकीदरम्यान पहलगाम हल्ल्याच्या बाबतीतही असेच घडेल असा आरोप केला. २६ एप्रिल रोजी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने म्हटले, “मी हे पुन्हा पुन्हा सांगेन की जर बिहारच्या निवडणुका पहलगामच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या तर बिहारचे स्वतःचे मुद्दे बाजूला पडतील.”
कश्मीर में आतंकी हमला हुआ और उसके फ़ौरन बाद मोदीजी ने आज बिहार में रैली कर दी…बिहार के मंच से ही पाकिस्तान को धमका दिया और जनता ने भी ताबड़तोड़ तालियाँ पीट दीं…
जो लोग भी मोदीजी की पॉलिटिक्स और बिहार की हालत को जानते हैं, उन्हें खूब समझ में आ रहा है कि पाकिस्तान को धमकी देने… pic.twitter.com/TowLyMgXXk
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) April 25, 2025
;
कोण आहे नेहा सिंह राठोड?
नेहा सिंह राठोड हिचा जन्म १९९७ मध्ये बिहारमधील जनदहा येथे झाला. नेहा सिंह राठोड ही एक राजकीय व्यंगचित्रकार आणि लोक गायिका आहे. तिला भोजपुरी गाण्यांसाठी देखील ओळखले जाते. नेहा सिंह राठोडने २०१८ मध्ये कानपूर विद्यापीठातून बी.एससीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली.
२०२० मध्ये नेहा सिंह राठोडने यूट्यूबवर तिचे चॅनेल सुरू केले आणि सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित झालेले ‘बिहार में का बा’ हे गाणे बिहारच्या कामगारांशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित होते. ज्यामुळे ती चर्चेत आली.
पूरी भाजपा के नेताओं के जितने बच्चे फ़ौज में होंगे…उससे ज़्यादा तो मेरे अपने परिवार के लोग सेना में अपनी जान दाँव पर लगा चुके हैं…
…लेकिन आज भाजपा का आईटी सेल मुझे देशद्रोही कह रहा है क्योंकि मैं बिना डरे सवाल पूछती हूँ.
प्रधानमंत्री से सवाल पूछना देशद्रोह है क्या?… pic.twitter.com/t6ImAbbZpX
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) April 27, 2025
जुलै २०२३ मध्ये, मध्य प्रदेशातील लघुशंकेच्या एका घटनेशी संबंधित व्यंगचित्र पोस्ट केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या काळात तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
हेही वाचा:
Dam Water Storage : राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

