सातारा – सातारा जिल्ह्यातील 14 एप्रिल 2019 रोज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे. या संबंधाने मिरवणुक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढवी किंवा काढु नये. मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे व लाऊड स्पीकरचा यासाठी, तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा. पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दि. 14 एप्रिल 2019 त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व मा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.