पिंपरी | येथे मतदान अधिकारी कर्मचारी यांना दुसरे प्रशिक्षण

पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी होणार्या निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत नियुक्त करणात आलेले अधिकारी व कर्मचार्यांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या निवडणुक प्रशिक्षणासाठी 1837 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
त्यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख तसेच नोडल अधिकारी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणे, केंद्रप्रमुख, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. देशमुख यांनी अधिकारी कर्मचा-यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी मतदानाच्या दिवशीच्या मतदान केंद्रावरील प्रकियेचे नाटक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नोडल आफिसर, सेक्टर ऑफीसर यांनी मतदान अधिकारी यांचे कर्तव्य कसे पार पाडायचे याचे अभिनयानातून सादरीकरण केले.





