पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा होतील.
एप्रिल-मे 2021च्या परीक्षा करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता आता परीक्षांबाबत मार्गदर्शक तत्वे व सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी जारी केल्या. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, मौखिक, सेमिनार, प्राजेक्टस, डेझरटेशन आदी परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर पूर्ण करण्यात यावे. अंतर्गत गुण संगणक संरक्षित प्रणालीमार्फत विद्यापीठाकडे पाठवावे लागणार आहे. द्वितीय सत्राची समरी उपलब्ध झाल्यावर त्वरीत गुण भरणे अनिवार्य राहणार आहे.
द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या वेळी डेझरटेशनकरीता परीक्षा अर्ज भरण्यात आलेल्या एम.ई., एम.फार्म, एम.आर्किकटेचर या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या डेझरटेशनच्या परीक्षांचे महाविद्यालय स्तरावर प्राचार्य यांनी परीक्षकांची समिती गठीत करुन विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करुन त्यांना या परीक्षेत मिळालेले गुण 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन पाठविणे आवश्यक आहे.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पुणे विद्यापीठाच्या
संकतेस्थळावर उपलब्ध आहे.
प्रत्येक विषयाच्या एक तासाच्या ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील.
परीक्षेची सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेलद्वारे पाठवली जाईल.
ऑनलाइन परीक्षेसाठी छायांकित प्रत व फेरमूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही.
विज्ञान शाखेच्या अंतिम वर्ष अंतिम सत्र परीक्षा
70 टक्के अभ्यासक्रमावर होतील.
उर्वरित सर्व विद्याशाखांच्या परीक्षा
100 टक्के अभ्यासक्रमावर होतील.