Maharashtra Assembly Winter Session | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरात होत आहे. काल अधिवेशनच्या पहिल्या दिवशी ईव्हीएमसह अनेक मुद्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विविध मुद्द्यांवरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे नागपुरात परभणी, बीडच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला घेरण्याचा तयारीत आहे. तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नागपूरात दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. आज सायंकाळी सात वाजता आमदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. परभणीतील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली. बीडमध्ये मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सोमवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान आणि गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येवरून परभणीतील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे जाब विचारला. दोन्ही घटनांवर सभागृहात चर्चा करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले. तर पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद आहे. मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या असून ज्या अर्थसंकल्पीय वाटपासाठी सरकारने मागितलेला अतिरिक्त निधी आहे. हेही वाचा : देशात भीक देणाऱ्यांवर दाखल होणार एफआयआर ; कोणत्या शहरांचा आहे समावेश ,काय आहे नवा नियम? वाचा सविस्तर