SEBI : शेअर बाजाराच्या व्यवहारावर असणार सेबीचे बारीक लक्ष

मुंबई : अमेरिकेतील हेज फंड जेन स्ट्रीटने गैरव्यवहार करून बराच नफा कमविण्याची माहिती समोर आली आहे. आता सेवेने या कंपनीवर बंदी घातली आहे. मात्र शेअर बाजारात समोर इतर अशा प्रकारच्या कसल्याही जोखीमा नाहीत असे स्पष्टीकरण बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांनी केले.जेन स्ट्रीट कंपनीने केलेल्या गैरववहाराची माहिती मिळाल्यानंतर बाजार नियंत्रकांनी वेगात उपाययोजना करून गेल्या आठवड्यात या कंपनीवर बंदी घालून 4,800 कोटी रुपये परत करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी सांगितले की, सेबीची शेअर बाजाराच्या कामकाजावर बारीक नजर आहे आणि गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर वेगात कारवाई केली जाते.
तसेच कारवाई जेन स्ट्रीट या कंपनीवर करण्यात आली आहे. मात्र इतर काही कंपन्या अशा प्रकारचे गैरव्यवहार करीत असल्याची माहिती सध्या तरी सेबीकडे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जेन स्ट्रीट प्रमाणे इतर काही व्यक्ती किंवा कंपन्या बाजारातील कामकाजावर परिणाम करत असल्याची शक्यता आहे का असे विचारले असता पांडे आणि सांगितले की अशा प्रकारच्या कसलीही जोखीम सध्यातरी आपल्या दृष्टीपथात दिसत नाही.
जर कोणी असे करत असल्याचे आढळून आले तर ते शोधण्यासाठी पुरेशी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. पुरेशी देखरेख असल्यामुळे जेन स्ट्रीट प्रकार उघडकीस आला आहे. ही देखरेख यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जानेवारी 2023 ते 2025 या कालावधीत जेन स्ट्रीट कंपनीने कॅश, फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये समांतर रित्या खरेदी विक्री करून या कालावधीत 36,671 कोटी रुपयांचा नफा कमविला असल्याचे आढळून आले आहे. नियमानुसारच या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे. इतर कोणी असा प्रकार केल्यानंतर कारवाई केली जाणे अपेक्षित आहे.
गुंतवणूकदारांच्या तोट्याचे मूल्यांकन
गेल्या तीन महिन्यात जेन स्ट्रीटच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे फ्युचर सेगमेंट मध्ये गुंतवणूक करणार्या रिटेल गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले आहे, या संदर्भात मूल्यांकन केले आहे का, असे विचारले असता पांडे यांनी सांगितले की सध्या तरी हे मूल्यांकन केलेले नाही. मात्र ही प्रक्रिया चालू असून गेल्या तीन महिन्यात यामुळे रिटेल गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले याची माहिती लवकरच तपशीलात जाहीर केली जाणार आहे.





