Scorpio Parking: चोरीच्या भीतीने पट्ठ्याने चक्क छतावर पार्क केली स्कॉर्पियो ; व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले,” प्रेम ठीक आहे पण हे…”
Scorpio Parking:

Scorpio Parking: दीड ते दोन टन वजनाची कार घराच्या छतावर उभी करणे धोकादायक ठरू शकते. कारण, घराचे छत किंवा बांधकाम एवढ्या मोठ्या वजनाचा भार सहन करण्यासाठी तयार केलेले असेलच असे नाही.
मात्र, बिहारमधील गोपालगंज येथील मनोज यादव यांच्या कुटुंबीयांनी याची पर्वा न करता चक्क दोन मजली घराच्या छतावर नवीन स्कॉर्पिओ क्लासिक उभी केली आहे. या अनोख्या पार्किंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्कॉर्पिओसाठी चक्क ‘पेंटहाऊस पार्किंग’! Scorpio Parking:
मनोज यादव हे कामानिमित्त इस्रायलमध्ये असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या अनुपस्थितीत घरातील नवीन स्कॉर्पिओ चालवण्यासाठी कोणी नसल्याने ती सुरक्षित ठिकाणी उभी करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. मात्र, त्यांनी त्यासाठी चक्क आपल्या दोन मजली घराचे छत निवडले. यानंतर क्रेनच्या मदतीने स्कॉर्पिओ थेट घराच्या छतावर नेण्यात आली. गाडी छतावर पोहोचवतानाचा हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
बघता-बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्सवर शेअर करत मिश्कील अंदाजात प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, स्कॉर्पिओ जवळपास कुठेही चढू शकते, याची त्यांना आधीपासूनच कल्पना होती; मात्र या कुटुंबाने ही गोष्ट काहीशी जास्तच गांभीर्याने घेतल्याचे दिसते.
Now that’s what you call taking parking to the next level… 🙄
When Manoj Yadav of Gopalganj, who works in Israel, was left without anyone to drive his newly acquired Scorpio Classic, his family apparently decided that the safest parking spot was on the roof of their two-storey… pic.twitter.com/cGSUmmKohG
— anand mahindra (@anandmahindra) September 8, 2026
आनंद महिंद्रांनी दिला महत्त्वाचा इशारा
या अनोख्या पार्किंगच्या कल्पनेचे कौतुक करतानाच आनंद महिंद्रांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. छत एवढ्या वजनाचा भार सहन करण्यासाठी तयार केले आहे की नाही, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
गाडीवरील प्रेम आणि अनोख्या कल्पनेसाठी त्यांनी कुटुंबाला श्रेय दिले; मात्र सर्वसामान्यांना अशा प्रकारचा प्रयोग न करण्याचा स्पष्ट इशाराही दिला. ‘हे घरी करून पाहू नका’, असा सल्ला त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी दिला.
सोशल मीडियावरही रंगली चर्चा Scorpio Parking:
आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर कमेंट्समध्येही मोठी चर्चा रंगली. काही युझर्सनी स्कॉर्पिओ मालकांच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी हा प्रकार सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे म्हटले.
स्कॉर्पिओ क्लासिकचे वजन साधारण १,६०० ते १,९०० किलोच्या आसपास असू शकते. त्यामुळे एवढ्या वजनाची गाडी घराच्या छतावर उभी करण्यापूर्वी बांधकामाची भारवाहक क्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा छताला तडे जाणे, संरचनात्मक नुकसान होणे किंवा गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर हा प्रकार कितीही भन्नाट वाटत असला, तरी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशा पद्धतीने घराच्या छतावर वाहन उभे करणे टाळणेच सुरक्षित आहे.




