नवी दिल्ली – आजपासून 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यानुसार अनेक बदल होणार आहेत. आजपासून टोल महाग होणार आहे. यामुळे आता तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे. तर 7 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
1) सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता
दर महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार 1 एप्रिल पासून एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या नव्या किंमती जाहीर केल्या जाऊ शकतात.
2) टोल महागणार
आजपासून अनेक द्रुतगती मार्गांवरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आता 18 टक्के अधिक टोल भरावा लागणार आहे. तर दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे आणि NH-9 वरील टोल टॅक्समध्ये 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
3) 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर जास्तीत जास्त 30 टक्के कर आकारला जाणार आहे.
4) वाहनांच्या किंमतीत वाढ
1 एप्रिल पासून वाहनांच्या किंमती वाढ होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, होंडा या कंपन्यांच्या गाड्या महागणार आहे. यापूर्वीच या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली होती.
5) सोने महागणार
सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्क याआधी 20 टक्के इतके त्यात 25 टक्के वाढ केली आहे. तर चांदीवरील सीमाशुल्कात 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सोने-चांदी महाग होणार आहे.
6) 15 वर्षे जुने वाहने भंगारात
शासनाने 1 एप्रिलपासून 15 वर्षे जुने सरकारी वाहन भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन’ पोर्टल तयार केले. पण, खासगी वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र शुल्क भरून आणि फिटनेस टेस्ट करून त्यांची वाहने वापरता येणार आहेत. मात्र या शुल्कात मोठी वाढ केली आहे.