पुणे – पुणे विद्यापीठातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिझिक्स (आयुका) येथे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली होती. विज्ञान दिनानिमित्त ही संस्था सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असते.
या निमित्तानं प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि आयुका मधील अनेक संशोधकही उपस्थित होते. या वर्षीच्या प्रदर्शनातील LIGO (Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) हा प्रकल्प खास आकर्षण होतं.
दरम्यान, संस्थेमध्ये प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोर्रिआ यांनी केली.