कारमध्ये बसवून शाळकरी युवतीचा विनयभंग; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Updated On:

शिक्रापूर (वार्ताहर) – पाबळ (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीला कारमध्ये घेऊन जात तिचा विनयभंग केला. पोलिसांनी सरफराज शकील इनामदार या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.
पाबळ येथील अल्पवयीन युवती क्लासला जाण्यासाठी थांबलेली होती. सरफराज इनामदार हा युवक कार घेऊन याठिकाणी येऊन तुझ्या भावाने तुला बोलावले आहे. माझ्या सोबत चल असे युवतीला म्हणून तिला कारमध्ये बसवून गावातील चौधरी वस्ती येथे घेऊन जात युवतीचा विनयभंग केला.
याबाबत पीडित युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. सरफराज शकील इनामदार (रा. चौधरी वस्ती, पाबळ) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत त्याला अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करीत आहेत.
टॅग्स:





