मोठी बातमी : 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाही; आदेशाला स्थगिती
Updated On:

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून निर्बंध शिथील करण्यात येत आहे. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या मात्र या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश काढला होता. या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. हा निर्णय आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणे धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.





