“हीटरचा शॉक’ लागून शाळकरी मुलाचा मृत्यू
Updated On:

तळेगाव दाभाडे – अंघोळ करण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा हीटरचा शॉक लागून मृत्यू झाला. सांगुर्डी (ता. खेड) येथे रविवारी (दि. 15) सकाळी ही घटना घडली. उत्कर्ष सुधीर भसे (वय 14, रा. सांगुर्डी, ता .खेड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मयत उत्कर्ष देहू येथील जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत सातवीमध्ये शिकत होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तो उशिरा उठला. झोपेतून उठल्यानंतर तो अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी त्याने हीटर सुरू केला. हीटर सुरू झाल्यानंतर त्याचा हात चुकीने हीटरला लागला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने उत्कर्ष याचा मृत्यू झाला.





