सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर मिरवणुकीत पाडला पैशांचा पाऊस; पुणे जिल्ह्यातील घटना

दावडी (पुणे) –  हातात नोंटांचा बंडल आणि समोर पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड.. पैशाला लक्ष्मीच्या रुपात पहाणारेच पैशाची निवडणुकीत अशी उधळण करतायत.

गावकी भावकीची निवडणुक आता ग्रामीण भागातही प्रतिष्ठेची झालीय यातच निवडणुकीत पैशाचा ट्रेंड वाढत चालला असताना खेड तालुक्यातील दावडी गावात सरपंच निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर मिरवणूकीत गावातील तरुणाने हातात नोटांचा बंडल घेतला अन् गावच्या चावडीवर चक्क नागरिकांची पैशासाठी झुंबड लागली…

दावडी गावात काल सरपंच निवड बिनविरोध झाली. याच दरम्यान गावच्या चावडीसमोरच तरुणाने गावच्या नागरिकांसमोर पैशाचा बंडल काढला अन् पैसे उधळण्यास सुरूवात केली. ते पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड झाली. हा प्रकार इथेच न थांबता मिरवणुकांना बंदी असतानाही डिजे वाजवत, जेसीबीतुन गुलाल, भंडाराची उधळण करण्यात आली. हा सर्व प्रकार प्रशासनासमोर घडलाय. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अद्यापही कुठलीही कार्यवाही झाली नाही.

पैसा हा लक्ष्मीच्या रुपात पाहिला जातो. मात्र, आता याच पैशांचा पाऊस निवडणुकीत पडतोय हे दुर्दैवी आहे. लोकशाहीमध्ये नागरिकही पैशामागे धावतात हेच वास्तव धक्कादायक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.