सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर मिरवणुकीत पाडला पैशांचा पाऊस; पुणे जिल्ह्यातील घटना

Updated On:

दावडी (पुणे) –  हातात नोंटांचा बंडल आणि समोर पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड.. पैशाला लक्ष्मीच्या रुपात पहाणारेच पैशाची निवडणुकीत अशी उधळण करतायत.

गावकी भावकीची निवडणुक आता ग्रामीण भागातही प्रतिष्ठेची झालीय यातच निवडणुकीत पैशाचा ट्रेंड वाढत चालला असताना खेड तालुक्यातील दावडी गावात सरपंच निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर मिरवणूकीत गावातील तरुणाने हातात नोटांचा बंडल घेतला अन् गावच्या चावडीवर चक्क नागरिकांची पैशासाठी झुंबड लागली…

दावडी गावात काल सरपंच निवड बिनविरोध झाली. याच दरम्यान गावच्या चावडीसमोरच तरुणाने गावच्या नागरिकांसमोर पैशाचा बंडल काढला अन् पैसे उधळण्यास सुरूवात केली. ते पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड झाली. हा प्रकार इथेच न थांबता मिरवणुकांना बंदी असतानाही डिजे वाजवत, जेसीबीतुन गुलाल, भंडाराची उधळण करण्यात आली. हा सर्व प्रकार प्रशासनासमोर घडलाय. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अद्यापही कुठलीही कार्यवाही झाली नाही.

पैसा हा लक्ष्मीच्या रुपात पाहिला जातो. मात्र, आता याच पैशांचा पाऊस निवडणुकीत पडतोय हे दुर्दैवी आहे. लोकशाहीमध्ये नागरिकही पैशामागे धावतात हेच वास्तव धक्कादायक आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : 10 वर्षांचा न्यायालयीन वाद संपला; दोन जिवलग मित्र पुन्हा एकत्र, वकिलांच्या पुढाकाराने 'तडजोड'

2026-08-25 21:23:46

Pune : 10 वर्षांचा न्यायालयीन वाद संपला; दोन जिवलग मित्र पुन्हा एकत्र, वकिलांच्या पुढाकाराने 'तडजोड'

Hingoli : हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन; जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर पैसे फेकून व्यक्त केला संताप

2026-07-15 21:45:32

Hingoli : हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन; जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर पैसे फेकून व्यक्त केला संताप

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'नो खाते तपासा; पैसे जमा होण्यास सुरुवात, SMS आला नसेल तर....

2026-06-16 18:34:24

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'नो खाते तपासा; पैसे जमा होण्यास सुरुवात, SMS आला नसेल तर....

State Excise Department : हातभट्टीवाल्यांवर कारवाई नाही केली तर गाव कारभारीच अडचणीत; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

2026-06-11 10:34:29

State Excise Department : हातभट्टीवाल्यांवर कारवाई नाही केली तर गाव कारभारीच अडचणीत; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Sarpanch : श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी शिंदे यांची निवड

2026-04-29 21:49:44

Sarpanch : श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी शिंदे यांची निवड