विखुरलेले केस, कपाळावर कुंकू… बॉलीवूड अभिनेत्रीचा ‘जटाधरा’ सिनेमातील खतरनाक लुक

Jatadhara Film | बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूडमधील यशानंतर आता सोनाक्षी तेलुगू सिनेमातून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक व्यंकट कल्याण यांचा ‘जटाधरा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील सोनाक्षीचा फर्स्ट लुक समोर आला आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून जटाधरा चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवे पोस्टरही जारी केले आहे. झी स्टुडिओच्या इन्स्टाग्राम पेजवर सोनाक्षीचा पहिला लूक जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे “या महिला दिनी जटाधराध्ये शक्ती आणि सामर्थ्याचा प्रकाशस्तंभ उभा राहतोय. सोनाक्षी सिन्हा तुमचे स्वागत आहे,” असे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेतील पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
विखुरलेले केस, कपाळावर कुंकू आणि डोळ्यावर गडद काळ्या रंगाचं काजळ असलेली सोनाक्षी दिसत आहे. तिने हातात, गळ्यात आणि डोक्यावर दागिने परिधान केले आहे. तसेच तिची हाताची लांबलचक नखे जास्तच भीतीदायक वाटत आहे. सध्या हे पोस्टर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘जटाधरा’च्या पहिल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच सोनाक्षीचा हा लूक पाहून चाहत्यांची चित्रपटासाठी खूप उत्सुकता वाढली आहे.
‘जटाधरा’ चित्रपटात सोनाक्षीसह बिग बॉस फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकर देखील पाहायला मिळणार आहे. ‘जटाधरा’ चित्रपट सस्पेंस थ्रिलर आहे. सुधीर बाबू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप समोर आले नाही.
हेही वाचा:
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती





