शिरूर – सविंदणे (ता. शिरूर) येथील सविंदणे ग्रामपंचायतीच्या वतीने महीलादीनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. गावामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयमान सरपंच सोनाली खैरे ह्या होत्या.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरीक्षेत्र आधिकारी तनुजा शेलार, बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक कक्षाच्या शिल्पा ब्राम्हणे, डॉ. कमल राठोड,आरोग्य कमर्चारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक महीला, महीला ग्रामंपचायत सदस्या, बचत गटाच्या महीला, यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार यांनी महिलांचे आरोग्य, गटसमुह, महीलांचे सक्षमीकरण,शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन केले.
शासकीय योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे सरपंच सोनाली खैरे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच भाऊसो लंघे, बाळासाहेब खैरे, बारकू भापकर, वसंत पडवळ, बाबाजी पडवळ, बाळासाहेब भोर, दत्ता नरवडे, विठ्ठल पडवळ, मोहन किठे, प्राचार्य संपत धावडे, वनपाल नंदकिशोर पाटील, ग्रामसेवक कुंदन रोकडे, तलाठी आबासाहेब मोरे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.
प्रास्ताविक डॉ .पंजाबराव देशमुख विदयापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ व सुत्रसंचालन प्राध्यापक शंकर गोफने यांनी आभार उपसरपंच भाऊसो लंघे यांनी मानले. फोटो ओळ- जागतिक महिला दिनी ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करताना