सत्यप्रेम की कथा ची रिलीज डेट जाहीर

‘भूल भुलैया 2’ मधून धमाकेदार कमाई करणाऱ्या कार्तिक आर्यनने आता त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी सुरू केली आहे. तसे, सध्या तो शहजादा या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पण सध्यातरी त्याचा सत्यप्रेम या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे.
समीर विद्वांस दिग्दर्शित कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवालाचा नमः पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने सत्यप्रेम की कथा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
शूटिंगच्या सुरुवातीपासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ ही एक संगीतमय प्रेमकथा आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. यापूर्वी दोघांनी भूल भुलैया 2 मध्ये काम केले होते आणि ही जोडी पडद्यावर हिट ठरली होती. बड्या कलाकारांचे बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप होत असताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
अलीकडेच कार्तिक आर्यन आणि विवेक अग्निहोत्री यांचा सेल्फी समोर आला आहे. हा फोटो पाहून युजर्सनी दोघांच्याही चित्रपटाबाबत अंदाज बांधायला सुरुवात केली. काही काळापूर्वी विवेक अग्निहोत्रीने ‘द काश्मीर फाइल्स’नंतर दिल्ली फाइल्स चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. आता दोघांचे सेल्फी पाहून या चित्रपटात कार्तिक अभिनेत्यासोबत दिसणार असल्याचा अंदाज लोकांकडून लावला जात आहे.





