अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ‘सत्याग्रह’ हेच प्रभावी हत्यार – राहुल गांधी
Updated On:

नवी दिल्ली, दि. 26 – अन्याय, दडपशाही आणि अत्याचाराच्या विरोधात सत्याग्रह हेच प्रभाव हत्यार असते हे आपण इतिहासातून शिकलो आहोत. बंदच्या निमीत्ताने शेतकऱ्यांनी चालवलेला हा सत्याग्रह म्हणूनच उचित ठरतो आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
एका ट्विटच्या माध्यमातून हे मत व्यक्त करतानाच त्यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थनही केले आहे. हा सत्याग्रह देशहिताचा व शांततेचा असावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
तीन कृषी विषयक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर गेले चार महिने ठिय्या दिला असून या आंदोलनाकडे सरकारने जे दुर्लक्ष चालवले आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आज बारा तासांचा हा बंद पुकारला होता.





