Satara : वडूजमध्ये शनिवारी पशुचिकित्सा शिबीर

वडूज : रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक, गुरुभक्त तात्यासाहेब माने यांच्या स्मरणार्थ वडूज येथील कर्मवीरनगर मित्रमंडळ व नढवळ येथील मायाक्का तरुण मंडळ, सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शनिवार, दि. २१ रोजी पशुचिकित्सा शिबीराचे आयोजन केल्याची माहिती डॉ. मनोज माने यांनी दिली.
शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेश्राम यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी विभागप्रमुख डॉ. खांडेकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबीरात पशुंच्या सर्व आजारांवर मोफत तपासणी तसेच उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कुत्रा या संवर्गातील सर्व प्राण्यांचे रेबीज लसीकरण व निर्बिजीकरण (ऑपरेशन) करण्यात येणार आहे.
शिबीरात वडूज दावाखान्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. गावडे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. लोखंडे, डॉ. खाडे, डॉ. म्हस्के, डॉ. जाधव, डॉ. चपने, डॉ. तासगावकर, डॉ. बुधे, डॉ. दोलताडे, डॉ. प्रतिक जाधव, डॉ. साळुंखे, डॉ. बोडरे, डॉ. इनामदार, डॉ. डिसले, डॉ. प्राची वैद्य, डॉ. शेलार, डॉ. यादव, डॉ. रांगनेकर, डॉ. गायकवाड, डॉ. शेडे, डॉ. कदम, डॉ. धायगुडे, डॉ. जाधव, डॉ. साळवेकर, डॉ. अगिवले उपचार करणार आहेत. श्वान पालकांनी वडूज पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.





