हवेची गुणवत्ता समाधानकारक
Updated On:

पुणे – दिवाळीदरम्यान 200 पार गेलेले हवेचे प्रदूषण आता पुन्हा सर्वसामान्य पातळीवर पोहोचले आहे. पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर असल्याची नोंद सफर-आयआयटीएम या संस्थेने घेतली आहे. शहरातील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय घट झाली असून, प्रदूषकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी झाले आहे.
दिवाळीत फटाके न वाजविण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फटाके फोडले. परिणामी जोरदार आतषबाजीमुळे शहरात हवेच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली होती.
उत्सव कालावधीदरम्यान शहरातील हवेची गुणवत्ता ही चांगलीच खालावली होती. लक्ष्मीपूजनाच्या एका रात्रीत हवेचे प्रदूषण तब्बल 100 ने वाढून 201 मेट्रिक घनमीटरपर्यंत पोहोचले. तर हवेची गुणवत्ता ही “अतिशय वाईट’ स्तरावर खालावली होती.





