शेतीच्या नुकसानाचे उपग्रहाव्दारे सर्वेक्षण

Satellite survey of agricultural damage – शेतकर्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचे, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकर्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.
शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे चौहान म्हणाले.
शेतकर्यांच्या विकासासाठी मंत्रालयानं सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा चौहान यांनी घेतला तसंच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लखपती दीदी आणि यशवंत शेतकर्यांचा यावेळी चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं चौहान यांनी सांगितले.


